Loading…

Monday – Saturday : 11 am – 6 pm


Emergency Will Be Taken 24x7

आणि मन भरून आल..*

30th May 2021 By Admin



लग्नाला 8 वर्ष झालीत मँडम पण घरी पाळणा हलत नाही, सगळे नातेवाईक टोचून टोचून हिला नकोनकोस करतात. ह्याआधी 7-8 दवाखाने झालेत कोणी काही समजवत नाही आणि गुण देखील येत नाही.

काही होणार नसेल तर तसा सांगा मँडम ह्या चक्रातून सोडवा , नेहमीच असे कपल येतात. गुण येत नाही पेक्षा लोका टाकून बोलतात आणि डॉक्टर समजावून सांगत नाहीत च दुखः बोचर असत. काही काळजी करू नका, माझ्यावर विश्वास टाकणार असाल तर मी तुमची केस घेते, अशा वेळी बुडत्याला पानाचा आधार नात्याने दोघेही हो म्हणाले.
7-8 वर्षे होऊनही बाळ राहत नाही म्हटल्यावर मी सगळे तपास नव्याने करवले कारण तपास पाळीच्या योग्य वेळी होणे देखील तितकेच आवश्यक असते.
एका लँप्रोस्कोपी द्वारे तिच्या गर्भाशयातील दोष समोर आला मग योग्य उपचाराद्वारे गर्भधारणेसाठीची पुर्वतयारी करण्यात आली. हे सगळे करण्यात 4-6 महीने गेले ह्या दरम्यान पेशंटचा हुरुप टिकवून ठेवण हे ही एक दिव्यच.. पण पेशंट आणि माझ्या नशिबाने ते दोघे पूर्ण विश्वासाने माझ्याकडे येत राहिले.
देवाने आमच्या सगळ्यांच्याच तपाला आशीर्वाद दिला, कोमलला ईनफर्टीलीटीच्या उपचारानंतर जुळे राहिले, फोन करून तिला बोलताच येईना तिचे आनंदाचे हुंदकेच सगळ बोलून गेले. कोमल खुश होती पण खरी लढाई आता समोर होती हे मला कळत होत..
8 महीने डोळ्यात तेल टाकून तिला योग्य उपचार देऊन तिला दोन गोंडस बाळ हाती देताना खरच आभाळ ठेंगण वाटल, पण अजूनही कोमल थोडी आँफ वाटली, का ग काय झाल छान आहेत की तुझे चंगु मंगु?
मँडम खर सांगू जर दोघांपैकी एकही मुलगी झाली असती तर तिला तुमचच नाव द्यायच होत!!!

आणि मन भरून आल...!


डॉ स्वधा कोतपल्लीवार जन्नावार
आँराडेल, प्रतापनगर
नागपूर

Maternity | Gynaec Care | Infertility Clinic and Plastic Surgery
at - Contact: 919890852912 / 9689892912
Auradale: Himalaya Excellency, Near Pratap Nagar Police Chowki, Nagpur
#auradale #auradalenagpur #gynaeccare #Womenhealthcare #gynaeccare #womenhealth #infertilitytreatment #maternity #childbirth #nagpur #ivf