Monday – Saturday : 11 am – 6 pm
वैषाख वणव्यात तापल्यावर अवचित येणाऱ्या थंडगार झुळुकेने शहारा यावा, दिवसभरात जगाच्या रहाटगाडग्यात दमून आल्यावर
घरात पाय ठेवल्यावर दूडूदूडू धावय येऊन चिमुकल्या हातांनी घातलेली ती मिठी, परगावी एखाद्या मोठ्या कामासाठी गेल्यावर
(आमच्या बाबतीत एखाद्या सर्जरी साठी) तिथून शीणवटा घेऊन येताना अचानक काँलेजातल्या वेळच एखाद अगदी 'दिल के करीब'
असलेला अस गाण कानी पडाव, आँफिसात झालाय टी ब्रेक म्हणून बळजबरीचा चहा घेतांना जुन्या दोस्ताचा फोन यावा आणि त्या
आपूलकीने भरलेल्या कठोर आणि अंमळ सभ्यतेच्या कक्षेत न येणाऱ्या शब्दांचा भडीमार व्हावा, शाळा काँलेजातल्या मुलामुलींच्या ग्रुपवर
अँक्टिव असल्याचे पाहून एका काळच्या तुमच्या पासवर्ड चा तुम्हाला dm यावा..
बस ह्या सगळ्यात जी मजा आहे तोच आजचा विषय आहे!
मिळवायचाच म्हणून झगडून मिळालेला आनंद आणि अशा अनपेक्षित आलेल्या आनंदाच्या लाटेत चिंब भिजायला जी मजा आहे त्याला तोड नाही..
कधी तरी एखादा दिवस असाच आनंदाची कारंजी फुलवत येतो, तरुण वयात पित्रुछत्र हरवलेला एक मुलगा घर सावरण्यासाठी सैन्य भरती साठी मेहनत करतो कठीण परिस्थिती वर मात करत सगळ्या परिक्षा लिलया पार पाडतो पण शेवटी एका छोट्याशा शारीरिक व्यंगासाठी खोळंबा होतो. आजवरची सगळी मेहनत आता पाण्यात जाणार अस वाटत असताना कोणीतरी नाव सांगितल म्हणून पठ्ठ्या येऊन भेटला सगळी कर्मकहाणी सांगून म्हणाला साहेब खूप ऐकून आलोय काही मदत कराल का.. एखादा पेशंट आला की कारण नसताना त्याच्या बद्दल खूप आपूलकी वाटावी तस्सा होता हा.. पोरगा नडलेला होता पण स्वाभिमानी वाटला, मला पण त्याचा स्वाभिमान दुखवायचा नव्हता थोडासा अंदाज घेऊन त्याला झेपेल अश्या नाममात्र शुल्कात सर्जरी ठरली.. सर्जरीच्या दिवशी हा जवान 3तास ऊशीरा उगवला माझ बाकीच प्लानिंग फिसकटल म्हणून मी ह्याच्यावर डाफरलो तर हा म्हणतो काय! सर पैसे साठवलेले होते पण घरी आजारपण चालू आहेत तर आत्ता नको आपण सर्जरी करायला तेच सांगायला आलोय. काय बोलणार सांगा पोरगा जेन्यून वाटत होता पण ताठ कण्याचा होता..
मला त्याचा तो स्वाभिमानी अहंकार मारायचा नव्हता, मी म्हटल अरे राजा येवढच ना आपण तूझ आँपरेशन लोकल अँनास्थेसिया मधे करू तू फक्त औषधांचे पैसे दे मला तुझी नौकरी पक्की झाल्यावर पार्टी दे.. खरच तुम्ही कराल माझ्या हाताच आँपरेशन? म्हटल असा खांबासारखा उभा राहिला तर नाही करणार जा आत ot मधे लेटला तर करेल, स्वारी खुषीत आत गेली. त्याच्या बोटांमधील दोष आम्ही एका नाजूक सर्जरीने दूर केला.. पोरगा जाम खूष होता मी औषधांचे 472 /- मोजून घेतले त्याच्याकडून. नंतर 10 दिवसांनी तो परत आला आता त्याची परिक्षा जवळ आली होती टाके काढून झाल्यावर तो गायबच झाला, म्हटल जाऊ देत झाल कसेल काही.
एक दिवस opd मधे कोणी पेढ्याचा डब्बा सोडून गेला, सिस्टरला पण फारसा कळालं नाही की कोणी सोडला.. आता अर्धांगिनी गायनेक असल्यामुळे पेढे बर्फी चे रतीब ओपीडी मधे चालूच असते.. तर असो दोन पेढे पोटात तर गेले अन मागाहून फोन वाजला..
सर ओळखलत का दिपक बोलतोय माझ्या बोटाच आँपरेशन तुम्ही केल होत, माझ फिजिकल पास झाल सर तुमचे खूप खूप आभार!! सर मित्राच्या हाताने पेढे पाठवले होते मिळाले ना? अच्छा तर ही होती त्या गूढ पेढ्याची कहाणी .. आनंदाची किक का काय म्हणतात ना बस ती आली!!
सर नागपूरला येतोय ट्रेनिंग साठी जाताना तेव्हा. नक्की भेटतो तुमचे पैसे पण द्यायचे आहेच..
देवानं हात दोन दिलेत पण पोट मात्र एकच, कदाचित एका हाताने पोट भरताना दुसऱ्या हाताने मदत करता यावी म्हणून असेल..
आता आतूरतेने दिपकची वाट बघतोय, उरलेले पैसे घ्यायला नाही तर त्याच्या चेहऱ्यावरच लाखमोलाच स्मित पाहून आणखी एक किक घ्यायला!!
डॉ गौरव जन्नावार
प्लास्टिक सर्जन
ता.क.- सदरहू पेशंट सोबतचा फोटो नसल्याने डॉक्टर स्वतःचा फोटो टाकण्याची हौस पुर्ण करत आहेत.🙂
डॉ स्वधा कोतपल्लीवार जन्नावार
आँराडेल, प्रतापनगर
नागपूर
Maternity | Gynaec Care | Infertility Clinic and Plastic Surgery
at - Contact: 919890852912 / 9689892912
Auradale: Himalaya Excellency, Near Pratap Nagar Police Chowki, Nagpur
#successstory #successstoryatauradale #auradale #auradalenagpur #gynaeccare #Womenhealthcare #gynaeccare #womenhealth #infertilitytreatment #maternity #childbirth #nagpur #ivf